दिल्ली राजमुद्रा दर्पण। तुम्ही स्वस्त घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बँक ऑफ बडोदा तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलीय, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात निवासी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. BOB या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. 8 डिसेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. बँक ऑफ बडोदा ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली. बँकेने ट्विटमध्ये लिहिले की, मेगा ई-लिलाव 8 डिसेंबर 2021 रोजी केला जाईल. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा ई-लिलाव केला जाणार आहे. तुम्ही येथे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.
बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावासाठी ई-बक्रे पोर्टल https://ibapi.in/ वर नोंदणी करावी लागेल. या पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करावी लागेल.
बोलीदाराला आवश्यक KYC कागदपत्रे अपलोड करावी लागतील. केवायसी कागदपत्रांची ई-लिलाव सेवा प्रदात्याद्वारे पडताळणी केली जाईल. यास 2 कार्य दिवस लागू शकतात. मालमत्तेच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची वेळेत परतफेड केलेली नाही किंवा काही कारणाने ते देऊ शकलेले नाहीत. त्या सर्व लोकांच्या जमिनी बँकांनी ताब्यात घेतल्यात. अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते.