(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)
२०१९ मध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर विधान परिषदेसाठी या आघाडीने १२ उमेदवारांची नावे राज्यपालांना देण्यात आली होटी मात्र त्या १२ नावांचा प्रस्ताव असलेली फाईल सापडत नसल्याचे स्पष्टीकरण राजपाल्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलं होत. हे प्रकरण काहीसं तापल्यानंतर ती फाईल राजभवनातच आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या गोंधळावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या शब्दात प्रतिक्रिया दिली. “हरवलेली फाईल मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्या फाईलवर राज्यपाल जेव्हा सही करतील, तेव्हा आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू”, अशी प्रतिक्रिया मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत राउतांनी दिली.
“राजभवनातील फाईल भूताने पळवली असं मला वाटत होतं. पण आता फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवलेली नव्हती. पण असं असलं तरी राजभवनाच्या आसपास काही भूतं असावीत”, असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. “फाईलच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने प्रश्न विचारला आहे. फाईलवर वेळेत न होण्यासाठी ती फाईल बोफोर्स, राफेल किंवा कोणत्या भ्रष्टाचाराची आहे का?”, असा सवालही त्यांनी केला.
“महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाने १२ सदस्यांची नावं दिलेली आहे. हा एकमताने घेतलेला निर्णय आहे. तरीही त्यावर ८ महिने निर्णय होत नसेल, तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते न शोभणारे आहे. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी त्यांच्या कामातील गतीमानता वाढवली तर महाराष्ट्राची गतिमान परंपरा टिकून राहील”, असं मत त्यांनी व्यक्त केलं. १२ सदस्यीय फाईलवर सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय वारे वाहत असून ह्या वाऱ्याची दिशा आता कोणत्या दिशेला वाहणार यावर महाराष्ट्र लक्ष देऊन आहे.