जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘कोविड -19’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. किमान एक डोस घेतला असल्याचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयातील आहरण व सवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त करुन घेतल्यानंतरच माहे नोव्हेंबर 2021 (paid in माहे डिसेंबर2021 ) या महिन्यातील वेतन देयक अदा करावे. ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘कोविड -19’ प्रतिबंधात्मक लसीकरणाची एकही डोस घेतलेला नाही, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन होणार नाहीत अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ लशीच्या दोन्ही डोस घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यांनतर 14 दिवस झालेले आहेत, अशी कोणतीही व्यक्ती असा आहे किंवा ज्या व्यक्तीची वैद्यकिय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टरांकडील प्रमाणपत्र आहे, अशी कोणतीही व्यक्ती असा आहे किंवा 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असा असल्याचे संदर्भिय आदेश 27 नोव्हेंबर 2021 मध्ये सूचित करण्यात आलेले आहेत.