नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । तुम्हाला तात्काळ पैशांची गरज असेल आणि तुमचे पीएफ अकाऊंट असेल तर तुमची पैशांची अडचण दूर होऊ शकते. याआधी पीएफ खात्यातून पैसे काढणे थोडे वेळखाऊ काम होते. मात्र आता एका तासात तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. कोरोनाच्या काळात लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने पीएफशी संबंधित नियमांमध्ये काही बदल केले होते. कोणताही ग्राहक त्याच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून 1 लाख रुपये आगाऊ काढू शकतो. या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत दिला जात आहे.
ईपीएफने कोरोनाच्या वेळी उपचारांच्या सोयीसाठी ही विशेष व्यवस्था सुरू केली होती. मात्र आता इतर आजारांच्या उपचारांसाठीही याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एखादी व्यक्ती गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल असेल आणि त्याला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल, तर तो त्याच्या खात्यात एक लाख रुपये सहज ट्रान्सफर करू शकतो. पूर्वीच्या उपचारांप्रमाणेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पैशांची गरज भासल्यास त्यासाठी वैद्यकीय बिले सादर करावी लागत होती. आता त्याची गरज नाही आणि पूर्वी पीएफचे पैसे मिळण्यासाठी 3 दिवस लागायचे, ते आता एक तासावर आले आहे.
आपला क्रेडेंशियल्स म्हणजे यूएएन क्रमांक आणि पासवर्डचा उपयोग करुन यूनिफाइड पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ (मेंबर इंटरफ़ेस) वर लॉगिन करा. वेबसाइटच्या होम पेजवर वर उजव्या बाजूला ऑनलाइन एडवांस क्लेम (online advance claim) वर क्लिक करा. तुम्हाला एक लिंक nifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface दिसेल, त्यावर क्लिक करा. ऑनलाइन सर्विसेसमध्ये गेल्यावर क्लेम फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी भरावा लागेल. आपल्या बँक अकाउंटचे शेवटचे 4 अंक भरा आणि त्याला वेरिफाय करा. Proceed for Online Claim असा मॅसेज दिसेल, त्यावर क्लिक करा. ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये PF Advance सिलेक्ट करा. येथे तुम्हाला रक्कम काढण्याचे कारण सांगावे लागेल. कारण लिहिले असेल तेथे क्लिक करुन भरा. रक्कम नमूद करा आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा. त्यानंतर आपला पत्ता भरा. Get Aadhaar OTP वर क्लिक करा. आपल्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल तो टाका. यानंतर तुमचा एडवांस क्लेम सबमिट होईल. तुमच्या खात्यात एक तासाच्या आत पीएफ क्लेमचे पैसे येतील.