मुंबई राजमुद्रा दर्पण । मुंबई, पुण्यामध्ये १५ डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय हाती घेतला आहे. मात्र, ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण करत जात असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली आहे. स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन, शाळांविषयी निर्णय घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
टास्क फोर्सबरोबर चर्चा करुन, शाळांची नियमावली बनवली आहे. पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज असल्यास पुढील निर्णय घेतले जाणार आहेत, असे देखील त्यांनी सांगितले आहे. लहान मुलांच्या लसीकरणाविषयी कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आली नाही. मात्र लहान मुलांचे आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे. यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरु करण्यात यावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे मत देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले आहे.