मुंबई राजमुद्रा दर्पण। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस विरोधात लूकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. रविवारी जॅकलिनला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले होते. सुकेश चंद्रशेखर प्रकरणामध्ये सक्तवसुली संचलनालयाने 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ईडीने लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. जॅकलिन दुबईकडे एका कार्यक्रमाकरिता जात होती.
दिल्लीमधील कार्यालयात हजर होण्यासाठी ईडी नव्याने जॅकिलनला समन्स जारी करण्यात येणार आहे. ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरोधामध्ये 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी 7000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तिहार जेलमध्ये असताना त्याने एका उद्योजकाच्या पत्नीकडून 200 कोटींची वसूली केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या आरोपपत्राच्या दाव्यानुसार 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे सापडले आहेत. यावेळी जॅकलिन सुकेशला डेट करत होती, असेही सांगितले जात आहे. त्यांचा एक फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. जॅकलिनबरोबर या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचा देखील उल्लेख केला जात आहे. सुकेशने नोराला खूप महागडी कार भेट म्हणून दिली होती. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने याअगोदर दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे. या अगोदर नोरा फतेहीच्या प्रतिनिधीने ती एक पीडित असल्याचा दावा करण्यात आला होता.