नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतात एन्ट्री केली आहे. पुणे येथे ओमिक्रॉनचे ६ रुग्ण आढळले आहे. डॉक्टरांचा असा दावा आहे की, ओमिक्रॉन व्हेरिएंट कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा 5 पट जास्त संसर्गजन्य आहे. ज्या वेगाने तो दक्षिण आफ्रिकेतून जगभरातील इतर देशांमध्ये पसरला आहे. हा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य आहे. मात्र, हा व्हेरिएंट किती घातक आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ओमिक्रॉनने सर्वांचीच चिंता वाढवली आहे.
एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनची लागण झाली असेल तर त्याला सतत थकवा जाणवू शकतो. दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या चेअरपर्सन अँजेलिक कोएत्झी यांना ओमिक्रॉनच्या संसर्गामध्ये थकवा ही सर्व लक्षणे आढळून आली आहेत. कोरोनाच्या या अत्यंत संसर्गजन्य व्हेरिएंटने संक्रमित व्यक्तीला शरीरात दुखणे आणि इतर अनेक प्रकारच्या वेदना होऊ शकतात. ओमिक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित व्यक्ती डोकेदुखीची तक्रार करू शकते. ही डोकेदुखी कधीकधी खूप तीव्र असू शकते.