मुंबई राजमुद्रा दर्पण। कोरोना विषाणू संसर्ग आणि इतर कारणांमुळं आरआरबी एनटीपीसी परीक्षा 7 वेळा स्थगित केल्यानंतर 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. रेल्वे भरती बोर्डानं नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. आरआरबीने जारी केलेल्या सूचनेनुसार परीक्षेचं आयोजन 2022 मध्ये केलं जाणार आहे. ही परीक्षा 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. याशिवाय आरआरबीनं एनटीपीसी सीबीटी -1 निकालाची तारीख जाहीर केली आहे. आरआरबीनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दक्षता घेत परीक्षेचं आयोजन केलं जाणार असल्याचं सांगितलं आहे.
फेब्रुवारीमधील स्थिती पाहून परीक्षांच्या तारखा बदलण्याची आवश्यक असल्यास त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं आरआरबीनं कळवलं आहे. rrbcdg.gov.in या वेबसाईटवर नोटीस जारी केली आहे. आरआरबीनं जारी केलेल्या नोटीसनुसार एनटीपीसी सीबीटी-1 परीक्षेचा निकाल जानेवारी 2022 मध्ये जाहीर केला जाणार आहे. फर्स्ट स्टेज सीबी आरआरबी एनटीपीसी सीबीटी परीक्षा निकाल 15 जानेवारी 2022 पर्यत जाहीर केला जाणार आहे. आरआरबीच्या विविध प्रादेशिक वेबसाईटस वर निकाल जाहीर केला जाईल. उमदेवारांनी ज्या विभागातून अर्ज केला असेल त्या विभागाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे.