जळगाव राजमुद्रा दर्पण । महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच जळगाव व एक वही एक पेन संकलन समितीतर्फे शालेय साहित्य व एक वही एक पेन संकलन करण्याच आमूलाग्र कार्यक्रम राबविण्यात आला. गेल्या आठ वर्षापासून हा कार्यक्रम राबविला जात आहे.
हा कार्यक्रम कुणाकडूनही एक पैसा न घेता व कुठल्याही पक्ष्याचा प्रचार न करता आपण यशस्वीपणे राबवत असतो, आपल्यासारखे बाबासाहेबांवर प्रेम करणारे व बाबासाहेबांनी आणलेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या कार्याचा रथ पुढे नेण्यासाठी नेहमी आम्ही कार्यरत आहोत.
महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी येताना हार व मेणबत्तीच्या ऐवजी एक वही एक पेन तसेच इतर शालेय साहित्य आपण आठ वर्षांपासून जमा करतो व महापुरुषांच्या महापरिनिर्वाण व जयंती उत्सव दिनी आपण गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वस्ती वस्तीत जाऊन वितरीत करतो. बाबासाहेबांचे विचार हे सुकण्यासाठी नसून शिकण्यासाठी उपयोगी होतील बाबासाहेबांचा शब्द होता शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कूणी ते पिनार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
या कार्यक्रमास सचिन बडगे साहेब, डी.झेड मोरे साहेब, हरिश्चंद्र सोनवणे सर, प्रशांत बाबुलाल सोनवणे सर जळगांव, चेतन नन्नवरे, कपिल जाधव, प्रकाश दाभाडे, आर.के.सुरवाडे, डॉ.गौतम नन्नवरे, डॉ. प्रकाश वानखेडे, राष्ट्रपाल सुरडकर, सतीश निकम साहेब, अॅड.आनंद भाऊ कोचुरे, विजय गायकवाड, बबलू पेंढारकर अशा सर्व स्वयंसेवकांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पाडला.