मुंबई राजमुद्रा दर्पण। मुंबई महानगरपालिकेने सोनूला नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये त्याला हॉटेलमध्ये रुपांतरीत केलेल्या सहा मजली इमारतीचे पुन्हा निवासी इमारतीत रूपांतर करण्यास सांगितले आहे. सोनूला ही नोटीस 15 नोव्हेंबरला बजावण्यात आली होती. या इमारतीला हॉटेल बनवताना करण्यात आलेले बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोनूने मुंबई हायकोर्टात सांगितले होते की, मी बीएमसीच्या नियमांचे पालन करतो आणि स्वत: या इमारतीचे नूतनीकरण करून घेणार आहे.
सोनूने अद्याप या इमारतीचे नूतनीकरण केलेले नाही, असे बीएमसीने पाठवलेल्या या नोटीसमध्ये म्हटले आहे. नोटीसमध्ये बीएमसीने असेही म्हटले आहे की, ‘तुम्ही पहिल्या आणि सहाव्या मजल्यावरील कामे थांबवू असे सांगितले होते. तसेच त्याचा उपयोग रहिवाशांसाठी होणार असल्याचे सांगून काही महत्त्वाचे काम करून घेत असल्याचे देखील सांगितले होते. मात्र, बीएमसीच्या अधिकाऱ्याने 20 ऑक्टोबरला जागेची पाहणी केली असता आपण नियोजनानुसार काम सुरू केले नसल्याचे दिसून आले आहे.