नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यूपीए संदर्भात निर्णय घेतील. यूपीएनं समर्थपणानं एकत्र येऊन विरोधकांनी ताकद निर्माण केली पाहिजे, असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं मत आहे. महाराष्ट्रात काँग्रेससोबत एकत्र आहोत. संसदेत एकत्र आहोत. लोकसभा आणि राज्यसभेत निर्णय घेताना एकत्र आहोत, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग हा मिनी यूपीए असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर, दुसरीकडे संजय राऊत आज राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक दुपारी दिल्लीत तीन वाजता होणार आहे.
गोव्यात तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवणार ही नवी माहिती असून तुमच्याकडून मिळतेय, असं संजय राऊत म्हणाले. गोव्यात टीएमसीसोबत शिवसेना जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र आणि गोव्याचं भावनिक आणि सांस्कृतिक नातं आहे. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची काय ताकद आहे हे आम्हाला माहिती आहे. गोव्यातील निर्णयासंदर्भात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठरवतील. आम्ही यापूर्वी गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत लढलो होतो, त्यामध्ये यश आलं नव्हतं, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.