मुंबई राजमुद्रा दर्पण। जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ संवर्गातील 22 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यास 7 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. https://mpsconline.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सैनिक कल्याण अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं संरक्षण दलांमध्ये मेजर रँकवर काम केलेलं असावं.
संबंधित उमेदावाराला मराठीचं ज्ञान असावं. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 719 तर राखीव प्रवर्गातील उमदेवारांना 449 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागेल. अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक व औरंगाबाद जिल्हा केंद्रावरील पुढील टप्प्यातील मुलाखती दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजीपासून आयोजित करण्यात येत आहेत. पुण्यात 13 ते 30 डिसेंबर दरम्यान मुलाखती होणार आहेत. तर, नाशिक केंद्रांवर 13 ते 23 डिसेंबर दरम्यान मुलाखती होणार आहेत.