धुळे राजमुद्रा दर्पण । जनता सोसायटीतील घराला सोमवारी पहाटे आग आणण्यात आली. जुन्या वादाची तक्रार मागे घेतली नाही याचा राग धरून ही आग लावली. या प्रकरणी मोलकरीण रुक्साना बानो शेख सलीम (वय ४०) या महिलेने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नदीम काल्या ऊर्फ नदीम रज्जाक शेख (रा. जनता सोसायटी), हमीद नाट्या, वसीम रंधा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार दागदागिने, शैक्षणिक व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसह हसीना बी अस्लम खाटीक यांचे संसारोपयोगी साहित्यासह आठ लाख रुपयांचे नुकसान, तीन बकऱ्या, कल्लू अन्सारी अब्दुला अन्सारी यांचे दोन लाखांचे नुकसान, निसार शेख यांचे तीन बकऱ्यांसह दहा लाखांचे नुकसान, मोहम्मद सलीम अब्दुल गफ्फार यांचे दहा लाखांसह रोकड, मोइदोद्दीन गुलाम रसूल खाटीक यांचे आठ लाखांसह २५ हजार रोख, शाकीराबी आरिफ शहा यांचे सात लाखांसह ७० हजार रोख रुक्सानाबी यासीन शहा यांचे दहा लाखांसह एक लाखाची रक्कम, आयशाबानो मोहम्मद अन्सारी यांचे पाच लाखांसह वीस हजाराची रोकड, नियाज सय्यद अस्लम यांचे दहा लाखांच्या नुकसानीसह पाच लाखाची रोकड आगीत जडून खाक झाली आहे.
पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेतली नाही म्हणून संशयितांनी नसीम बानो हिच्या घरात घुसून प्लास्टिकच्या बाटलीत पेट्रोल ओतून आग लावली. त्यामुळे सर्व नऊ घरांना आग लागून नुकसान केले. जनता सोसायटीतील संशयित नदीम काल्या (वय १९) याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा फिर्यादीच्या वहिनीचे घर जाळून टाकीन, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. रविवारी (ता.५) रात्रीही वाद झाला. त्यानंतर पहाटे आगीची घटना घडली.