धुळे राजमुद्रा दर्पण । धुळे शहरातील एकवीरा देवी मंदिरात जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी एकवीरा देवीचे दर्शन घेतले. राज्य शासनाला लवकरात लवकर सद्बुद्धी देऊन एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेवो; असे साकडे यावेळी या सर्व एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी एकवीरा देवीकडे घातले आहे.
गेल्या महिन्याभरापासून धुळ्यातील सर्व एसटी कर्मचारी संपावर बसलेले आहेत. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण होणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून बंद असलेली एसटी सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी एसटी महामंडळातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.