जळगाव राजमुद्रा दर्पण । एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून संप सुरू आहे. महामंडळानं आवाहन करूनही कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. जळगाव येथील ५१ कर्मचाऱ्यांना मंगळवारी निलंबित करण्यात आलं असून १५ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.
जिल्ह्यात एकूण कार्यरत ४,४४२ कर्मचार्यांपैकी ४१७ कर्मचारी कामावर रुजू झाले होते. यात आठ चालक व १ वाहकाचा समावेश होता. त्यानंतर आणखी २० चालक व २० वाहक रुजू झाले आहेत. या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भुसावळ अमळनेर व जळगाव या बस आगारातून बस सेवा दिली जात आहे. सध्या धुळे, चोपडा, पाचोरा जामनेर या मार्गावर सेवा दिली जात आहे.
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून संप सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसार, संपात सहभागी कर्मचार्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. याआधी जळगाव जिल्ह्यात संपात सहभागी झालेल्या एकूण २८१ कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आज ५१ कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती जळगाव एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली आहे.