नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही दीर्घ काळ चालणाऱ्या बचत योजनांपैकी एक योजना आहे. यातून तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर चांगला परतावा मिळतो. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमधून तुम्ही तुमचा निवृत्तीनंतरचा खर्च भागवू शकतात. तुम्हाला निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम ही योजना करते. या योजनेचा कालावधी हा साधारणपणे 15 वर्षांचा असतो. मात्र तुम्ही त्याला 20 वर्षांपर्यंत देखील वाढू शकता. जर तुम्हाला काही महत्त्वाच्या कामांसाठी पैशांची गरज लागलीच तर तुम्ही या योजनेमधून काही रक्कम योजनेचा कालावीधी पूर्ण होण्याच्या आधी देखील काढू शकता.
केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला पीपीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात बदल केला जातो. सध्या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. पीपीएफवर मिळणारे व्याज हे इतर कुठल्याही मुदत ठेव योजनेपेक्षा अधिक असते. पीपीएफचा आणखी एक फायदा म्हणजे, तुम्ही पीपीएफचा कालावधी तुमच्या आवश्यकतेनुसार पाच वर्षांपर्यंत वाढू देखील शकता. तसेच मुदत पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला गरज लागल्यास एका ठरावीक रकमेपर्यंत तुम्ही पैसे देखील काढू शकता.
पीपीएफ खाते उघडल्याच्या तीन वर्षांनंतर तुम्ही लोनसाठी पात्र ठरता. तुम्ही पाच ते सहा वर्षांत परतफेडीच्या मुदतीने पीपीएफ खात्यावर लोन घेऊ शकता. ज्यांना अचानक काही कारणासाठी वैयक्तीक लोनची गरज असते, अशा व्यक्तींना ही योजना फायद्याची ठरू शकते. गोल्ड लोनच्या तुलनेत पीपीएफ खात्यातून मिळणाऱ्या लोनवर आकारण्यात येणारा व्याज दर देखील कमी असतो.