मुंबई राजमुद्रा दर्पण। रिझर्व्ह बँकेच्या आज झालेल्या बैठकीत ईएमआय तेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच व्याज दरातही कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली आहे. तसेच कोरोना संकटातून देशाची अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचंही शक्तिकांत दास यांनी आज स्पष्ट केलं. मुद्रा धोरणाची समीक्षा करणारी रिझर्व्ह बँकेची बैठक प्रत्येक दोन महिन्याला होत असते. त्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं.
रेपो रेट 4 टक्क्यावर, रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. MPC ने आपला अकोमोडिटिव्ह कायम ठेवला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये RBI ने रेपो रेटमध्ये 0.75 टक्के आणि मेमध्ये 0.40 टक्के कपात केली होती. या कपातीनंतर रेपो रेट 4 टक्क्याने खाली गेला होता. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2021-22साठी जीडीपीचा अंदाजित दर 9.5 टक्के कायम ठेवला आहे. अर्थव्यवस्था आणि रिकव्हरीला मजबूत ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक दरात वाढ किंवा कपात करण्याचा निर्णय घेईल.