नंदुरबार राजमुद्रा दर्पण । सारंगखेडा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी यात्रेला परवानगी नाही. घोडेबाजार १८ ते २७ डिसेंबर या कालावधीत भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. श्रीदत्त जयंतीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करून शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही. पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या मर्यादीत ठेवून, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मास्क परिधान करणे, शारिरीक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि हात वारंवार धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.
ज्या ठिकाणी घोडेबाजारा भरणार त्या ठिकाणी घोडे विक्रेता, व्यापारी, तसेच खरेदीदार यांचे १०० टक्के लसीकरण व कोविड-१९ आरटीपीसीआर चाचणी ही ७२ तासांच्या आत झालेली आहे किंवा नाही ही बाब प्रामुख्याने पडताळणी केल्याशिवाय त्यांना घोडेबाजारात प्रवेश दिला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास कोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारवाई करण्यात येईल.