लातूर राजमुद्रा दर्पण| सोयाबीनच्या दरात चढ-उतार झालेला दिसून येत आहे. पण पुन्हा सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा होत आहे. केंद्र सरकारनेही आता सोयाबिनची आयात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दरात आणखी वाढ होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची साठवणूक अजूनही शेतकऱ्यांच्या फायद्याचीच ठरणार आहे. दर स्थिर असले तरी मात्र, बुधवारी सोयाबीनची आवक ही 15 हजार गेली होती. दिवाळीनंतर आजच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक झाली होती.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आता सोयापेंडची आयात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पोल्ट्रीफार्मधारक हे सोयाबीनचे दर नियंत्रणात रहावे म्हणून सोयापेंडची आयात करण्याची मागणी करीत होते. मात्र, या मागणीला राज्यातील शेतकरी, शेतकरी संघटना तसेच राजकीय नेत्यांचाही विरोध होता. 6 हजार 600 वरील सोयाबीन थेट 6 हजारावर आले होते. एवढेच नाही तर दरात कायम चढ-उतार राहिलेला आहे. त्यामुळे आणखी दर घटतील या धास्तीने शेतरकऱ्यांनी सोयाबीन विक्रीवर भर दिला होता.