नाशिक राजमुद्रा दर्पण। सध्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूने सगळ्यांनाच धडकी भरवलीय. त्यात नाशिक जिल्ह्यात अजूनही कोरोना रुग्ण सापडत आहेतच. त्यांनी मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. तुम्ही मास्क घातलेला नसेल, तर आता वाहनचालकाही दंड करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या 2 लाख 62 हजार 264 कार आणि जीप आहेत. तर 6 हजार 770 टॅक्सी आहेत. शिवाय 26 हजार 735 रिक्षा आहेत. त्यामुळे एखाद्या प्रवाशाने मास्क घातला नसेल, तर त्या टॅक्सीचालक अथवा रिक्षाचालकाला पोलीस जबाबदार धरून दंड ठोठावू शकतात. त्यामुळे आत्ताच सावध व्हा. नवा मास्क नसेल, तर लागलीच दंड बसण्यापूर्वी खरेदी करा.
महापालिका हद्दीत एखाद्या दुकानात ग्राहक विनामास्क आला, तर दुकानदाराला दंड ठोठावण्यात येणार आहे. असा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला आहे. त्यामुळे व्यापारी नाराज आहेत. सध्या तरी कोणावरही कारवाई सुरू करण्यात आली नाही. मात्र, गेल्या आठवड्यात जवळपास 22 नागरिकांकडून 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.