लखनऊ राजमुद्रा दर्पण । आगामी वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यातून यूपीत सत्तेवर आल्यास महिलांना नोकरीमध्ये 40 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
शक्ती, संकल्प, करुणा, दया आणि साहस हे महिलांचे गुण असतात. हेच गुण राजकारणातही यावेत ही आमची इच्छा आहे. आज केवळ महिलांबाबतची चर्चा केवळ कागदावरच असते. मात्र, काँग्रेसने महिलांना पंचायततीत 33 टक्के आरक्षण देऊन महिलांच्या सक्षमीकरणास सुरुवात केली होती. जेव्हा सत्तेत महिलांचा सहभागच नव्हता. त्याकाळात काँग्रेसने देशाला पहिली महिला पंतप्रधान दिली, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.