मुंबई राजमुद्रा दर्पण । किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार यांच्यावर पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शेलार यांच्या घरासमोर गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांकडून शेलार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता.
वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुंबईच्या महापौर घटनेनंतर 72 तासांनी रुग्णालयात पोहोचल्या. 72 तास कुठे होतात? मुंबई पालिकेत काय चाललंय? असे अनेक सवाल शेलार यांनी उपस्थित केले. त्यानंतर पेडणेकर यांनी शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.