मुंबई राजमुद्रा दर्पण। अखेर आज कतरिना कैफ ‘मिसेस कौशल’ होणार आहे. विकी आणि कतरिना सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे सात फेरे घेणार आहेत. या लग्नाला मित्रपरिवार आणि काही बॉलिवूड सेलिब्रिटी कुटुंबासह उपस्थित राहणार आहेत. मात्र, सलमान खान या लग्नाला उपस्थित राहणार नाही. तर, आता समोर आलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारही या लग्नाचा भाग होणार नाही.
सलमान खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह विकी-कतरिनाच्या लग्नात सहभागी होणार होता. पण आता तो कतरिनाच्या लग्नात सहभागी होणार नाही आहे. सलमान आज रियाधला जात असताना विमानतळावर स्पॉट झाला होता. त्याचवेळी अक्षय कुमारही रियाधला पोहोचला आहे. त्याची काही छायाचित्रे समोर आली आहेत. जे पाहून हे दोन्ही कलाकार विकी-कतरिनाच्या लग्नाला जाणे टाळत आहेत, असे म्हणता येईल.