बीड राजमुद्रा दर्पण । शहरातील घाणीचे साम्राज्य, रस्त्यावर खड्डे, वेळेवर पाणी पुरवठा न होणे, या नागरिकांच्या समस्यांना घेऊन शिवसंग्रामच्या वतीने बीड नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगरपालिका प्रशासनाविरोधात प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
शहरातील अनेक प्रभागात साधे रस्तेही व्यवस्थीत नाहीत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याच्या आजाराचा त्रास होऊ लागलाय. दोन्ही धरणे पुर्णपणे भरलेले असताना दहा ते पंधरा दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी शिवसंग्रामच्या वतीने कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांसह बीडकर सहभागी झाले होते.