नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 व डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत. गेल्याच आठवड्यात केजरीवाल सरकारने व्हॅट कपातीचा निर्णय घेतल्याने दिल्लीमध्ये इंधनाच्या किमती काहीप्रमाणात कमी झाल्या आहेत.
पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महिनाभरापासून दर स्थिर आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 तर डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 104.67 आणि डिझेल 89.79 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91. 43 रुपये इतके आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.