सिंधुदुर्ग राजमुद्रा दर्पण । राऊतांच्या जीभेचे तर संशोधन करायला हवं असं माझं मत आहे. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आपले गुरू मानू नये आणि बोलू नये. हिंमत असेल तर त्यांनी आपल्या शब्दावर ठाम रहावं आणि पोलिसांचा गरड बाजूला करा मग जीभ कशी वापरायची हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता दाखवेल असा टोला नितेश राणे यांनी यावेळी राऊतांवर लगावला आहे.
घाणेरडं राजकारण करून जे बोललं नाही त्या वक्तव्यावर कशाला बोंबाबोंब करत आहात इंपेरिकल डाटा हा राज्य सरकारने तयार करायचा आहे. त्यासाठी 200 ते 300 कोटी हे राज्यसरकारने आपल्या अर्थखात्यातून द्यायचे आहेत. हे पैसे राज्य सरकारने का दिले नाहीत हे ओबीसींचे नेते छगन भुजबळ आणि विजय वडडेट्टीवार यांनी सांगावं. तो डाटा तयार न केल्यामुळे ओबीसी समाजाच्या उमेदवारांवर मोठा अन्याय झाला आहे. मग नेमके जबाबदार कोण आहे?
शिवसेनेच्या युवा नेत्यांनी दिशा सालीयनचा मर्डर करावा, तिच्यावर अत्याचार करून तिला इमारतीवरून फेकलेल चालतं. शिवसेनेच्या मंत्र्यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूला जबाबदार असलेलं चालते. आशिष शेलारांनी जे कधी म्हंटलच नाही ते या लोकांना चालत नाही. महिलांवरील अत्याचाराबद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार राहिला आहे का? यांच्या राज्यात महिला सर्वात असुरक्षित, कायदा आणि सुव्यवस्था यांचे धिंडवडे निघाले आहेत.