औरंगाबाद राजमुद्रा दर्पण। औरंगाबाद महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शहरातील शाळांबाबतचा निर्णय आज 10 डिसेंबर रोजी घेण्यात येणार होता, मात्र तो आणखी पाच दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाले असल्याने विविध जिल्हा आणि शहरांमधील शाळा आधी सारखी ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्यासंबंधी विचार सुरु आहे. राज्य शासनाने यासाठी परवानगी दिलेली असली तरीही जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्रशासनाने स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.
शहरातील शाळा सुरु करण्याबाबचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याता आल्याची माहिती महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुन्हा 15 डिसेंबर रोजी बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत शहरातील शाळा सुरु होण्यासंबंधी अंतिम निर्णय होईल,