जळगाव राजमुद्रा वृत्त सेवा | राज्यात लसीकरणाचे तुटवडा वरून भाजप व महाविकासआघाडी मध्ये कलगीतुरा शाब्दिक युद्ध रंगले आहे यावरून स्थानिक भाजपा नेतेही केंद्र शासनाच्या विरोधात तर भाजप नेते महा विकास आघाडीच्या विरोधात बोलू लागले आहे. यावरून आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते महाजन यांच्यावर मिश्किली टीका केली आहे
गिरीश भाऊंना माझा सल्ला आहे पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी स्टेजवर बोलावून घेतले होते त्याचा काही प्रभाव पडला असेल तर त्यांनी जळगाव साठी व महाराष्ट्रासाठी लसीचा आणावी “गिरीश भाऊ यांनी आवश्यक तो साठा महाराष्ट्रासाठी मिळवून दिला तर त्यांचा मी भर चौकात सत्कार करेन” अशी मिश्किली टिक्का राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाच्या उपलब्ध ते वरून देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे राज्य सरकार जर संपूर्ण लसी घ्यायला तयार असेल तर लस देण्याचा अधिकार कोणाला आहे हे मी सांगण्यापेक्षा गिरीश भाऊंना राजकारण कोण करतय हे चांगले माहिती आहे
जर लसी वेळेत उपलब्ध असल्यास तर राज्य शासनाची एवढी मोठी यंत्रणा सज्ज आहे त्या दोन-तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करून देऊ शकतात जोपर्यंत लसीचा संपूर्ण साठा उपलब्ध होत नाही ‘ तोपर्यंत परमेश्वर जरी आला तरी लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही ” असे गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे