मुंबई राजमुद्रा दर्पण। हिंदी चित्रपटांपुढे यांचा टिकाव लागेल का हिंदीमुळे मराठीला हव्या तशा स्क्रिन्स आणि शोज मिळतील का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण या सर्वच प्रश्नांना अतिशय सकारात्मक आणि सणसणीत उत्तर दिलं आहे झी स्टुडिओजच्या ‘पांडू’ चित्रपटाने. पहिल्या तीन दिवसांतच तब्बल 1.91 कोटींची कमाई याशिवाय अनेक मल्टीप्लेक्समध्ये चालू असलेल्या हिंदी सिनेमाचे प्राईम टाइमचे शोज् कमी करून ते शोज् पांडूला देण्यात आले आहेत.
पूर्वी मराठी निर्मात्यांना सिनेमा प्रदर्शित करताना या अडचणींना सामोरं जावंच लागायचं. पण मागच्या काही वर्षात झी स्टुडिओजच्या चित्रपटांनी हे चित्र बदललं. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मात्र सगळीच परिस्थिती बदलली. चित्रपट प्रदर्शनासाठी अनेक नियम आणि निर्बंध आले. या सगळ्याचा सामना मराठी चित्रपट कसा करेल असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. याच वातावरणात झी स्टुडिओजने आपला ‘पांडू’ हा सिनेमा प्रदर्शित केला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच भरभरून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.