नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण। आर्थिक वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धी दर हा 9 टक्क्यांच्या जवळपास राहू शकतो, असा अंदाज क्रेडिट सुइस या स्विस ब्रोकरेज फर्मने वर्तवला आहे. पुढील वर्ष भारतासाठी चांगले राहणार असून, अनेक सकारात्मक बदल पहायला मिळतील असेही कंपनीने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी भारताचा जीडीपी 10.5 टक्के राहणार असल्याची शक्याता देखील संस्थेने वर्तवली आहे.
दरम्यान चालू आर्थिक वर्षांच्या शेवटी जीडीपीमध्ये वाढ होऊन, तो 9 टक्क्यापर्यंत राहाण्याचा अंदाज काही दिवसांपूर्वीच भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून वर्तवण्यात आला होता. कोणत्याही देशाच्या आर्थिक वृद्धी दराबाबत अंदाज वर्तवणे हे कंपनीच्या धोरणामध्ये येत नाही. मात्र प्राप्त आकडेवारीवर नजर टाकल्यास पुढील वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर हा नऊ टक्क्यांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज आहे.