जळगाव राजमुद्रा दर्पण। आपण नेहमी बँकेचे व्यवहार करतो परंतु बऱ्याचदा आपल्याला क्रेडिट कार्ड कसे वापरावे, त्याचा नेमका फायदा काय आहे? हे माहित नसते, त्यामुळे आपला गोंधळ उडतो. कुठले क्रेडिट कार्ड फायद्याचे ठरू शकते हे जाणून घेणार आहोत. यामुळे भविष्यात आपला गोंधळ उडणार नाही तसेच कोणत्या बँकेची सुविधा घ्यायची आहे हे आपल्याला ठरवता येईल.
जर तुमच्याकडे पैसे कमी आहेत आणि तुम्हाला पैशांची गरज आहे. अशा वेळी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, मात्र क्रेडिट कार्ड आहे तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून बिल देऊ शकता.
तुम्हाला जर काही कारणांसाठी वैयक्तीक कर्जाची गरज भासली तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. तुमच्या क्रेडिट कार्डची जेवढी लिमिट आहे, तेवढ्यापर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकते. तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे नसतील तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून देखील तुमचा ईएमआय भरू शकता. जर तुमच्या कडे Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला त्यावर ५ टक्के कॅशबॅक मिळू शकते . किंवा तुमच्या कडे Axis Bank Ace क्रेडिट कार्ड असेल तर हे क्रेडिट कार्ड गुगल पे रिचार्ज आणि बिल पेमेंटवर 5 टक्के कॅशबॅक, Big Basket आणि वर 5 टक्के कॅशबॅक, Swiggy, Zomato, Ola वर 4 टक्के, इतर सर्व खर्चांवर 2 टक्के फ्लॅट कॅशबॅक देते.