मुंबई राजमुद्रा दर्पण। आयकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 6.74 कोटी लोकांनी इनकम टॅक्स भरला होता. परंतु या वर्षी आतापर्यंत केवळ 3.7 कोटी लोकांनीच आयकर रिटन दाखल केला आहे. याचाच अर्थ या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये केवळ अतिशय कमी लोकांनी इनकम टॅक्स भरला आहे. आयकर रिटन दाखल करण्याची शेवटी तारिख 31 डिसेंबर आहे. मागील पातळी गाठण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत आणखी 3.7 कोटी करदात्यांनी कर भरणे अपेक्षीत आहे. मात्र सध्या दिवसाकाळी केवळ चार लाख लोकच आयकर रिटन दाखल करत असल्याची माहिती आयकर विभागाकडून मिळाली आहे.
याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणेज वेबसाईमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्या आहेत. इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर आयकर रिटन दाखल करताना अनेक समस्या येत आहेत. त्या वेळेवर दूर होत नसल्याने करदात्यांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच कोरोनाचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनाकाळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या होत्या, त्यातील अनेकांना आजूनही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. त्यांचे आर्थिक स्त्रोत बंद असल्याने त्यांनी इनकम टॅक्स भरला नाही.