मुंबई राजमुद्रा दर्पण । राजधानी दिल्लीत संसदेच हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी इंग्रजी भाषेतून, देशातील बंद पडलेल्या आणि डबघाईला आलेल्या उद्योगांसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना उद्योजकांपर्यंत कशा पोहोचवणार, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला मंत्री नारायण राणेंना उत्तर व्यवस्थित देता आलं नाही, असं म्हणत शिवसैनिकांनी राणेंचा हा व्हीडिओ व्हायरल करायला सुरुवात केली. त्यानंतर हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून त्यामुळे मंत्री राणेंना अनेक टीकांचा सामना करावा लागत आहे.
खरतर पवारांना खुर्ची देण्याच्या वादावर बोलताना संजय राऊतांचा संयम सुटला. आणि नवा वाद सुरु झाला. याच मुद्यावरुन संजय राऊत आणि भाजप नेत्यांमध्ये सामना रंगलाय. राज्यातल्या काही नेत्यांची जीभ जास्तच चालायला लगली असं म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
नितेश राणेंनी राऊतांना त्यांनी कंगना रनौतबद्दल वापरलेल्या शब्दाची आठवन करुन दिली. पोलिसांचा गराडा बाजूला ठेवा मग जीभ कशी वापरायची ते दाखवून देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला. संजय राऊत विधानावर ठाम राहत नाहीत त्यामुळे राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंना गुरु मानू नये असही नितेश राणे म्हणाले.
राऊतांनी वापरलेल्या शब्दाचा वादही आता वाढत जातोय. सुरुवातीला राऊतांनी पवारांना दिलेल्या खुर्चीवरुन भाजप नेत्यांनी राऊतांना टार्गेट केलं. त्यावर उत्तर देताना राऊतांचा संयम सुटाल आणि नवा वाद सुरु झाला. आता संसदेतल्या व्हीडिओवरुन शिवसैनिकांनी राणेंना ट्रोल केल्याने नवा वाद सुरु झालाय.