नागपूर राजमुद्रा दर्पण । नाना पटोले यांनी दिलेला उमेदवार काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी बदलला. येवढा कमजोर प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला आजपर्यंत मिळाला नाही. जे पक्ष सांभाळू शकत नाही ते निवडणुका कशा लढतील? त्यामुळं काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाना पटोले यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं भंडाऱ्यात ओबीसी मतदार नाराज आहेत. काहींनी तर घरासमोर पाट्या लावल्यात. हे आरक्षण रद्द झाल्यानं आमच्या घरी मत मागायला येऊ नका, असं मतदारांचं म्हणण आहे. भंडारा येथे मतदारांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. आज आरक्षण देत असल्यानं आजचा डेटा लागेल. यामुळं भंडारा-गोंदियातील निवडणुका पुढे ढकलायला हव्यात. एका महिन्यात डाटा गोळा करणं शक्य आहे. या सरकारला ओबीसी समाजाच्या जागेवर सुभेदार लढवायचे आहेत. त्यामुळं ते ओबीसींचे आरक्षण टिकवू शकले नाहीत, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.