पुणे राजमुद्रा दर्पण । नवाब मालिकांच्या या टि्वटला भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं आहे. ”आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार नाही, तर आपल्यालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार,” अशा खोचक शब्दात सोमय्यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे. ”राजकीय आकसापोटी भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चैाकशी करीत असल्याचा आरोप आघाडीचे नेते करीत आहे.
एनसीबी, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांमधील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या चौकशा सुरू केल्यापासून हा विरोध अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मलिकांचे टि्वट आहे. तपास यंत्रणा आपली चैाकशी करणार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे या टि्वटच्या माध्यमातून सांगितलं आहे.
मलिक म्हणतात, “साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से.” एक-दोन दिवसात तपास यंत्रणा आपल्या घरी येईल, अशी शक्यता मलिकांनी व्यक्त केली आहे. ”घाबरणं म्हणजे रोज मरणं. आपल्याला घाबरायचं नाही, लढायचं आहे,” असं मलिकांनी ठामपणे म्हटलं आहे.