मुंबई राजमुद्रा दर्पण। ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. लसीकरणात ठाणे, नाशिक, जळगाव, नगर, नांदेड, सोलापूर, औरंगाबाद, बीड, यवतमाळ, लातूर हे १० जिल्हे भरपूर प्रमाणात मागे आहेत. १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्येत सिंगल डोस घेणाऱ्यांची संख्या ७६.६९% आहे. तर दुसरा डोस त्याचा निम्मेपटीने आहे.
२ डिसेंबरला ओमिक्रामचा पहिला रुग्ण सापडला होता. यामुळे केंद्र व राज्य सरकारांनी लसीकरण गतिमान करण्याची घोषणा केली होती. दुसरीकडे, जगातील ३० पेक्षा जास्त देशांनी बूस्टर डोसचा वेग वाढवला आहे. सामान्य लसीकरणाचाही वेग घेतला आहे. २ डिसेंबरला देशात रोजच्या लसींची सरासरी ८१.३९ लाख हाेती. ती आता ७४.४४ लाखांवर आली आहे. म्हणजे जगभरात लसीकरणाला वेग दिला जात असताना, भारतात मात्र ८.५% पर्यंत घटले आहे.