लातूर राजमुद्रा दर्पण । काही दिवसांपासून ‘ओमिक्रॉन’ चे रुग्न हे वाढत असून त्यावर लसीकरण हाच योग्य पर्याय आहे. त्यामुळे आता लसीकरणाच्या मोहीमेला अधिक गती देणे गरजेचे आहे. आता घरोघरी आरोग्य कर्मचारी जाऊन लसीकरण करणार आहे. ही ओमीक्रॉन’ची सुरवात असून योग्य खबरदारी हाच यावरचा सर्वात मोठा उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. नव्या वेरिएंटचे रुग्ण आढळत असले तरी अनेकजण मास्कचा वापरही करीत नाहीत. त्यामुळे आता कडक धोरणे अवलंबून लसीकरण पूर्ण करणे हेच सरकारचे उद्दीष्ट राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी ते लातूर जिल्ह्यातील औसा येथे आले होते. या दरम्यान, त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकही घेतली.
लातूरकरांनी लसीकरण करुन घ्यावे याकरिता वेगवेगळे पर्यांय महानगरपालिकेने राबवलेले आहेत. आता नव्यानेच ज्या नागरिकांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र नाही त्यांना रेल्वेचे तिकीट दिले जाणार नसल्याचा फतवा काढण्यात आला आहे. शिवाय खासगी वाहनांमध्ये प्रवाशाने मास्क नाही घातला तर दंड हा वाहनचालकास असाही नियम घालण्यात आला आहे. आता मात्र, घरोघरी जाऊनच लसीकरण हाच पर्याय आहे. असं अजित पवार यांनी सांगतिले आहे.