धुळे राजमुद्रा दर्पण । धुळे शहराची मल निस्सारण योजनेअंतर्गत भूमिगत गटारी करण्याच्या 154 कोटी रकमेच्या कामात धुळे महानगरपालिका व महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, धुळे या कार्यालयाव्दारे ‘जावई’ सारखे आदरातिथ्य व मानसन्मान दिल्या जाणा-या नियमबाह्य, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या भ्रष्ट कारभाराविरूध्द तातडीने राज्यस्तरीय गुणनियंत्रण व दक्षता समिती मार्फत चौकशी करण्यात येऊन दोषींविरूध्द कडक कायदेशिर कार्यवाही व्हावी, याबाबत देवपुर शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख ललित माळी यांनी मा. जिल्हाधिकारी सो. व मा. आयुक्त सो. धुळे महानगरपालिका यांना पत्र दिले आहे.
देवपुर येथे 154 कोटी रकमेच्या भूमिगत गटारी करण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला असून, निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. यामुळे कोट्यावधीचे बिलांवर डल्ला मारणाऱ्या ठेकेदाराने केलेले काम हे लोकार्पण अथवा सुरू होण्याआधीच बंद पडले असुन शासनाचा कोट्यावधीचा निधी हा निकृष्ट दर्जाच्या गटारीच्या कामात गेला असल्याची बाब नुकतीच उघडकीस आलेली आहे.
धुळे महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी तसेच महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी सर्वस्वी जबाबदार आहेत. यात धुळे महानगरपालिकेच्या सत्ताधारी भा.ज.पा. पक्षाच्या काही नगरसेवकांचे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारात हात बरबटले आहेत. म.जि.प्रा. व म.न.पा. मधिल संबंधित अधिकारी यांनी ठेकेदाराशी बेकायदा संगनमत करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे सदर भूमिगत गटारी सुरू होण्यापूर्वीच त्यात पावसाचे किंवा काही नागरीकांनी मलनिस्सारणाचे पाणी सोडल्यानंतर सर्व गटारीचे पाणी हे विविध चेंबर्समधुन बाहेर पडल्याने मोठ्या प्रमाणावर रस्त्यात डबके साचत आहेत. केवळ इस्टीमेटमध्ये नमुद केल्याप्रमाणे योग्य ते गुणवत्तेची काळजी घेण्यासाठी लावुन दिलेल्या निकषांचे पालन न केल्यामुळे भूमिगत गटारीसाठी पाईप अंथरतांना योग्य ती खोली न करणे, योग्य तो स्लोप न देणे नियमान्वये चेंबर न करणे, भ्रष्टाचार करण्यासाठी संपुर्ण कामाची गुणवत्ता ढासाळणे, निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरणे, स्किल लेबरचा वापर न करणे या सर्व बाबींच्या दोषात्मक कार्यपध्दतीमुळे देवपुर मधील मलनिस्सारण योजनेअंतर्गत केलेले काम हे अनेक ठिकाणी निरूपयोगी आहे. तसेच सदर काम हे नागरीकांना उपद्रव करणारे ठरत आहे, कारण निकृष्ट दर्जाच्या कामातुन अनेक मोठ्या भिषण समस्या या उद्भवत आहेत तर ज्यावेळेस पुर्णतः भूमिगत गटारी सुरू होताच सदर समस्येचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे व त्यात सर्वसाधारण माणसाच्या खिशातुन पैसा भ्रष्ट ठेकेदार व अधिकारी तसेच सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनी खाल्ल्याने नागरीकांना प्रचंड हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे व सदर हालअपेष्टांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर नागरीकांना भविष्यात सोसावे लागतील.
देवपुर मधिल फॉरेस्ट कॉलनी, अजय नगर या भागात तसेच संपुर्ण देवपुर परिसरात विविध ठिकाणी चेंबर्समधुन पाणी बाहेर येणे तसेच गटारीतील पाण्याचे भर रस्त्यात डबके साचण्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. गटारीतील सांडपाण्याचे डबके भर रस्त्यात साचल्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत आहे.
भ्रष्ट ठेकेदारास पाठीशी लपवण्यासाठी धुळे महानगर पालिका व म.जि.प्रा. कार्यालयात मोठ्या प्रमाणावर वस्तुस्थिती दर्शविणारे कागदपत्रे गहाळ करण्यात आलेले आहेत. तर खोटे व बनावट कागदपत्रांच्या आधारावर निकृष्ट कामातील कोट्यावधी रूपयाचा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न झालेला आहे. यावर राज्यस्तरीय गुणनियंत्रण व दक्षता समितीव्दारे चौकशी करण गरजेचे आहे. अश्या आशयाचे निवेदन देवपुर शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख – ललीत माळी यांनी मा. जिल्हाधिकारी साो. धुळे व मा. आयुक्त साो. धुळे महानगरपालिका यांना देवुन मलविस्तारण योजनेतील 154 कोटी रूपयाच्या कामाची स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.