जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा :- जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जामनेर तालुक्याला भेट देऊन लसीकरणाची पाहणी केली. तसेच त्यांनी नागरिकांशी संवाद साधून लसीकरणा बाबतच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ही अधिक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. डोस न घेतल्यावर लागू असलेले निर्बंध दुसरा डोस न घेतलेल्यांवर सुद्धा लागु असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नसेल त्यांचे जि.प.मराठी,उर्दू शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, नगरपालिका, नगरपालिका कर्मचारी यांनी समुपदेशन करून त्यांना घरोघरी जाऊन “हर घर दस्तक”अभियानांतर्गत त्यांचे पुढील दोन दिवसात लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले.
दुसरा डोस बाकी असलेल्यांची डिव लिस्ट काढून शिक्षकांमार्फत कॉल सेंटर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या.
फातिमा अंगणवाडी व पुरा भागातील विवेकानंद नगर येथे जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. मागील आठवड्यात व आता सुरू असलेल्या आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत त्यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.
“हर घर दस्तक” अभियानांतर्गत गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी यांनी मालदाभाडी येथे घरो घरी जाऊन नागरिकांचे मतपरिवर्तन करून मालदाभाडी येथील १००% लसीकरण पूर्ण करून घेतले.
जिल्हाधिकारी भेटी प्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, डॉ.पंकज माळी, डॉ.प्रशांत पाटील,वैभव देशपांडे,वनिता जाधव,कविता नवघरे, अनिता राठोड,आर.बी.एस.के.टीमचे सदस्य उपस्थित होते.