_वाकोद ग्रामपंचायत च्यावतीने मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबीर_
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा – जैन इरिगेशनच्या भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे वाकोद गांवपातळीवरचा आदर्श शेतकरी, आदर्श गृहिणी पुरस्कार दर 12 डिसेंबरला प्रदान होईल अशी घोषणा भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्वस्त कविवर्य ना. धों. महानोर यांनी केली. उत्तम शेती करणारा शेतकरी तसेच उत्तम संसार करणाऱ्या गृहिणीची निवड पुरस्कारासाठी केली जाईल. निपक्ष, पारदर्शक निवड करण्यासाठी पाच सदस्यीय निवड समिती असेल असेही महानोर म्हणाले. वाकोद येथील थोर सुपुत्र भवरलालजी जैन यांच्या ८४ व्या जयंती व शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या औचित्याने ग्रामपंचायत तसेच सेवाभावी संस्थेच्यावतीने मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि प सदस्या प्रमिलाताई पाटिल होत्या याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा नियोजन समिति सदस्य संजय गरुड जिल्हा बैंक संचालक नाना पाटिल वैद्य वेदांत सुरपाटने सौ सविता सुरपाटने प्राचार्य डी आर चौधरी प्राचार्य व्ही के चौधरी विनोदसिंहजी राजपूत पांडुरंग पाटिल पोलिस पाटिल संतोष देठे राजु कुमावत फारुख शेख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास जोशी यांनी केले यावेळी पोलिस पाटिल संतोष देठे सोपान गाढवे जैन चरिटीज चे किशोर कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी वाकोद सह परिसरातील नागरिकांनी आयुर्वेदिक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून जवळपास 80 ते 90 रुग्नानि आपली मोफत नाड़ी परीक्षण करुण घेतले व् नाममात्र शुल्कात आयुर्वेदिक औषधि घेतली वैद्य वेदांत सुरपाटने यांनी व्याधि पूर्णपणे बरा होण्याची खात्री दिली तसेच जिल्ह्यात प्रथम आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन केल्या बद्दल ग्रामपंचायतचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजु लोडते सर यांनी केले आभार महावीर गुळेचा यांनी मानले