जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्ह्यातील राष्ट्रवादी मध्ये पाहिजे तितके आलबेल नाही मात्र वरिष्ठ नेत्याच्या आदेश आणि सुचनेच्या पुढे अनेक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी झाली आहे. मात्र कोडी झालेल्या नेत्यांना एकटे सोडणे पक्षाला देखील परवडणारे नसल्याने त्यांचे देखील स्थानिक निवडणुकांच्या पातळीवर ऐकून घेतले जाईल हे सौदार्ह आहे. याचा प्रयत्य जिल्हा बँक चेअरमन निवडणुकीच्या पदाच्या निवडणुकीवेळी दिसून आला आहे. माजी मंत्री खडसेंच्या कन्या यांना पुन्हा संधी देण्यात येणार होती, मात्र जुन्या नेत्यांनी एकत्र येत मोठं बांधल्यामुळे माजीमंत्री देवकरांचे नाव चेरमन पदासाठी निश्चित केले गेले. विशेष म्हणजे जुन्या नेत्याचे नेतृत्व माजी मंत्री सतीश अण्णा पाटील यांनी केले आहे.
जिल्हा बँक निवडणुकी संदर्भात वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते, खडसेंची ईच्छा पुन्हा कन्या रोहिणी खडसे यांना चेरमन पद देण्याची होती मात्र घडले खडसेंच्या विरुध्द,गेली सहा वर्ष खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे ह्या चेअरमन पदावर कायम असताना पुन्हा त्यांना संधी म्हणून राष्ट्रवादीतील जुन्या नेत्यांमध्ये कलह निर्माण झाला होता. राष्ट्रवादीतील जुन्या नेत्याच्या विरुध्द आपल्या कन्येला चेअरमन बनविणे खडसेंना देखील परवडणारे नव्हते हे खडसे जाणून होते. राष्ट्रवादीकडून संचालक म्हणून निवडून आलेल्या संचालकांनी तर थेट बंडखोरी करण्याचे ठरविलें होते. मात्र आपल्याकडे जबाबदारी असताना वरिष्ठ पातळीवर चुकीचा संदेश जाईल यांची नोंद घेत खडसेंनी देखील कन्येसाठीचा चेरमन पदाचा आपला दावा सोडला व सगळ्यांची पंसती असलेल्या माजी मंत्री गुलाबराव देवकरांचे चेरमन पदासाठी नाव निश्चित करण्यात आले अन्यथा खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना जर चेअरमन पदाची सूत्रे देण्यात आली असती तर देवकरांना चेअरमन पदासाठी डच्चू देण्यात येणार होता. याबाबत आता अनेक राजकीय चर्चा जिल्हा पातळीवर सुरु आहे.
घरकुल घोटाळ्यात देवकर यांना शिक्षा सुनावण्यात आली असताना एका त्रयस्थ अर्जदाराने जिल्हा बँकेतील त्यांच्या उमेदवारी वर न्यायालयात आक्षेप नोंदविला, यामुळे देवकरांची राजकीय कोंडी झाली होती मात्र न्यायालयाने देवकरांना दिलासा देत त्यांच्या उमेदवारीचा मार्ग सोपा झाला. कायदेशीर कचाट्यातून दिलासा मिळताच माजी पालकमंत्री असलेले गुलाबराव देवकर यांचे पुन्हा एकदा राजकीय पूर्वसन करण्यात आले तर नव्याने राष्ट्रवादीत दाखल झालेले खडसे पिता-कन्येचे खच्चीकरण करण्यात आले का ? याबाबत राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
बारा आमदारांच्या मंजुरीचे प्रकरण अद्याप पर्यत राज्यपाल यांच्या पडून आहे. अद्याप पर्यत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिलेली नाही. यामुळे अनेकांच्या तोंडाला आमदारकीची पाने पुसली गेली आहे. यामध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे देखील नाव असून राष्ट्रवादीत जाऊन देखील ते विधानसभेच्या सभागृहात पोहचू शकलेले नाही यामुळे खडसेंचे पुनर्वसन कधी होणार ? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून आहे.