नवी दिल्ली राजमुद्रा वृत्तसेवा । अकोला विधान परिषदेत आमच्याकडे आकडा नव्हता. पण आमचा उमेदवार तगडा होता. तीन वर्ष ते सलग निवडून येत आहे. या निवडणुकीत आघाडीकडे एकूण 408 मते होती. भाजपची स्वत:ची 225 मते होती. वंचित आघाडी आणि इतरांची मिळून त्यांचाही आकडा 400 वर गेला होता. म्हणजे दोन्ही पक्षाकडे समसमान मते होती. पण आमची शंभर टक्के मते आम्हाला मिळायला हवी होती. ती मिळाली नाही. आघाडी असताना कॉग्रेस, राष्ट्रवादीची मते अधिक होती यामुळे आमचा विजय निश्चित होता मात्र आमच्या विश्वासाला तडा गेला आहे. हा पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे.
शिवसेनेची मते नगण्य आहेत. पण कोण्या एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही, असे सावंत माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. विश्वासाला तडा हा आघाडीतील सर्व पक्षांशी संदर्भात आहे. कुण्या एका पक्षाला दोष देत नाही. आम्हीही त्यावर विचार केला पाहिजे. हा पराभव आमच्यासाठी चिंतन करणारा असल्याची प्रतिकिया यावेळी अरविंद सावंत यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंना माहिती देणार
आमच्या तीन पक्षाची शंभर टक्के मते असताना मात्र याचा अर्थ विश्वासाला तडा जातोय. कसा जातोय याची माहिती आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनादेऊ. बाकीच्या पक्षप्रमुखांनीही त्यावर गंभीरपणे पाहावं, असं ते म्हणाले. सावंत यांना अंतर्गत धुसफूस संदर्भात विचारले असता त्यांनी आमच्या पक्षा अंतर्गत धुसफूस नसेलच असं म्हणणार नाही. असेलही. पण तेवढ्याने पराभव होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.