(कमलेश देवरे)
जळगाव राजमुद्रा वृतसेवा | जिल्ह्यात राष्ट्रवादी मध्ये खडसे गट अधिक सक्रीय झाल्याने मोठ्या प्रमाणात संघटनेत फेरबदल होण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तवली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच संघटनात्मक पदाकरिता चढाओढ सुरु झाली आहे. ‘राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांची उचलबागडी होणार?’ अश्या बातम्या सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आल्या आहे. त्यांच्या जागी खडसे समर्थक असलेल्या अशोक लाडवंजारी यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीत या फेरबदला मुळे वादाची ठिणगी पडली आहे.
मोदी लाट व जळगाव शहर भाजपचा बालेकिल्ला असतांना अभिषेक पाटील यांनी चांगलाच जम बसविला मात्र अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागतो की काय ? याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपच्या नेत्यांसोबत असलेली व्यावहारिक भागीदारी व संबध असा ठपका त्यांच्यावर राष्ट्रवादीतल्या अंतर्गत विरोधकांनी ठेवला आहे. २०१९ ची जळगाव विधानसभा निवडणूक पक्षांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी लढवली व दिग्गजांना लाजवेल अशी मोदी लाटेत फिप्टी (अर्धशतक) मारून मतदान मिळवले आहे. मात्र अचानक उचलबांगडीच्या वृत्ताने राष्ट्रवादीसह इतर राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.
२०१९ च्या विधानसभे करीता अभिषेक पाटील यांनी गेल्या काही वर्षापासून तयारी सुरु केली होती. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी सांगितल्या नुसार त्यांनी जळगाव विधानसभेतून निवडणूक लढवली, पक्षाचा आदेश पाळला म्हणून त्यांना शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली, विधानसभे नंतर त्यांनी गेल्या दोन वर्षात संघटन वाढी करिता मोठे परिश्रम घेतले, त्यात त्यांना यश आले मात्र आगोदर गटबाजीचे ग्रहण लागलेला राष्ट्रवादी खडसे गट सक्रीय झाल्याने राष्ट्रवादीत मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.