जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |मनपाची महासभा बुधवारी 15 रोजी होणार असून यामध्ये मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे कायदेशीर लढाईच्या कचाट्यात अडकलेल्या भाजपने बंडखोरांचा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे महासभेत अनेक मुद्दे तसेच कायदेशीर नियमांचा झालेला भंग यावर महापालिकेची महा सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
या ना त्या कारणामुळे भाजपाला कायदेशीर कोंडीत पकडण्याचे काम गेल्या काही दिवसात शिवसेना तसेच भाजपच्या बंडखोराकडून करण्यात आले यामुळे हाताची आलेली सत्ता देखील भाजपला गमवावी लागली यातच कोरोनाची लाट आल्यामुळे यामध्ये कुठलाही राजकीय डाव भाजपला आखता आलेला नाही. यामध्ये सर्वाधिक वर्चस्व बंडखोरांचे दिसून आले.भाजपा च्या सेटिंग नगरसेवकांना देखील बंडखोरांच्या माध्यमातून गटनेता निवडत प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकी दरम्यान मतदानासाठी व्हीप बजावण्यात आल्याने त्यांची देखील राजकीय कोंडी झाली यामुळे मोठा वाद मनपाच्या राजकारणात निर्माण झाला आहे.नेमका अधिकृत गटनेता कोण ? यावर भाजपची कायदेशीर लढाई न्यायालयात सुरू असून बंडखोरांनी देखील भाजप समोर कायदेशीर आव्हान उभे केले आहे. कोरोनाच्या लाटे नंतर प्रथमच ऑफलाईन महासभा होणार आहे. त्यामुळे अनेक प्रमुख मुद्दे जे ऑनलाइन सभेत सादर झालेले नाहीत असे मुद्यांवर देखील सत्ताधारी , बंडखोर व भाजप मध्ये खडाजंगी होण्याची दाट शक्यता आहे.
बंडखोरांनी राज्यातील शिवसेनेच्या सत्तेतील नेतृत्वाचा पुरेपूर फायदा उचलत भाजपला खिंडीत पकडले होते. मात्र असे असताना भाजपने न्यायालयात दाद मागत खिंड लढवली. गेल्या काही महिन्यांपूर्वी बडखोरांमधील आर्थिक हित साधत भाजप मध्ये घरवापसी केली. त्यावेळी दिलेली आश्वासनाची पूर्तता तसेच प्रभागात निधी न देण्यात आल्याचा ठपका उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर ठेवण्यात आला. घरवापसी केलेल्यांच्या रडारवर उपमहापौर कुलभूषण पाटील हे कायम राहिले कुलभूषण पाटील यांनी स्वतःच्या वॉर्डात भरगोस निधी वळवून घेतला मात्र आम्हाला वंचित ठरवण्यात आल्याचा आरोप घरवापसी करण्याऱ्यानी केला यामध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नैतिकतेचा आधार घेत माध्यमांसमोर पुरावे सादर करीत सर्वच आरोप फेटाळून लावले होते. भाजपमध्ये बंडखोरीची लाट रुजवणारे आताचे मनपातील मुखींया भाजपच्या रडारवर असणार अशी एकंदरीत चर्चा रंगली आहे.
ऑनलाइन सभेत अनेक मुद्दे हे दुर्लक्षित झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. यामध्ये भाजप नगरसेवक आघाडीवर होते. कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे गेले अनेक महिने महासभा ऑनलाईन घेण्यात आली होती. मात्र प्रथमच ऑफलाइन महासभा होत असल्याने नगरसेवकांमध्ये मुद्दे मांडण्यात चांगलीच स्पर्धा रंगणार असल्याची परिस्थिती आहे.