बोदवड राजमुद्रा वृत्तसेवा | काल बोदवड़ येथील ग्राम देवत रेणुका माता मंदिर येथे बोदवड़ नगरपंचायत निवडणुकीचे भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचे नारळ महाराष्ट्रचे माजी जलसंपदा मंत्री व संकटमोचक जामनेर नगरीचे आमदार मा.गिरीशभाऊ महाजन व इथल्या लोकप्रिय खासदार श्रीमती.रक्षाताई खड़से यांच्या हस्ते फोडून रैली काढून जामनेर रोड वरील अग्रसेन भवन येथे जाहिर सभा घेण्यात आली. भारतीय जनता पार्टी चे १० उमेदवार बोदवड़ नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यावेळी गिरीश भाऊंनी आपल्या भाषणातुन विरोधकांवर कड़ाडून टिका केली. ज्यांना मी पणाचा अहंकार आहे त्यांनी बोदवड़ शहराला पाणी का दिले नाही? अशा खोचक सवाल विचारला तसेच बोदवड नगरपंचायत हि राज्यातील अविकसित नगर पंचायत आहे असे ते म्हणाले शहरात अतिक्रमणचा विळखा, गटर नाही, प्राथमिक गरजा सुद्धा पूर्ण करता आल्या नाही. भारतीय जनता पार्टीची जर एक हाती सत्ता आली तर वर्षभरात योजनेचे काम पूर्ण करुन बोदवड़करांना रोज पाणी देतो असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.जामनेर शहरात आम्ही धरण बांधले, पथदिवे लावले, प्राथमिक गरजा पूर्ण केल्या ते इथे विरोधकांना सत्ता असतांना का करता आल्या नाही कारण त्यांची नीति नह्वती करायची. इथे फक्त अतिक्रमण व धूळ खात रस्ते आहे तसेच इथे लहान मुलांसाठी उद्याने नाहि, असेही ते त्यावेळी म्हणाले. लोकप्रिय खा. रक्षाताई खड़से, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, बेटी बचाव बेटी पढ़ाव चे राष्ट्रीय संयोजक राजेंद्रजी फड़के, भा.ज.पा चे जळगाव जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांनी हि यावेळी आपल्या भाषणातुन आघाडी सरकार व विरोधकांवर कड़ाडून टिका केली व भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित माजी मंत्री आ.श्री गिरिषभाऊ महाजन,खा.श्रीमती रक्षाताई खडसे,भा.ज.पा जिल्हाध्यक्ष आ.श्री राजुमामा भोळे,जि.प.अध्यक्षा ना.सौ.रंजनाताई पाटील,बेटी बचाव बेटी पढ़ाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्रजी फड़के,भा.ज.पा प्रदेश उपाध्यक्ष श्री अशोकभाऊ कांडेलकर,जि.प.उपाध्यक्ष श्री लालचंदभाऊ पाटील,भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष श्री नंदुभाऊ महाजन,श्री पद्माकरभाऊ महाजन,श्री प्रल्हादभाऊ पाटील,जिल्हा सरचिटणीस श्री मधुभाऊ काटे,श्री सचिन पान पाटील,यु.मो.जी.अ श्रीकांतभाऊ महाजन,प्रभारी श्री नवलसिंग पाटील, भा.ज.पा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सौ.अनिताताई अग्रवाल, श्री अनंतराव कुलकर्णी,भा.ज.पा ता.अध्यक्ष श्री प्रभाकर पाटील,जामनेर ता.अध्यक्ष श्री चंद्रकांत बाविस्कर,रावेर ता.अध्यक्ष श्री राजन लासुलकर,मु.नगर ता.अध्यक्ष श्री प्रफुल्ल जवरे,भुसावळ ता.अध्यक्ष श्री परीक्षित बऱ्हाटे,बोदवड शहराध्यक्ष श्री नरेश आहूजा,श्री अनिलभाऊ खंडेलवाल,श्री सुनिलभाऊ काळे, अमोल देशमुख, रोहित अग्रवाल इ.तसेच भा.ज.पा उमेदवार व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…*