जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत गेल्या अनेक महिन्यानंतर ऑनलाइन ऐवजी ऑफलाईन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून विविध विषय प्रलंबित असताना मात्र तब्बल 90 विषय महासभेच्या पटलावर घेण्यात आले होते. असे असताना मात्र सत्ता गेल्या नंतर प्रथमच भाजप बंडखोरांना घरवापसी देत 42 च्या बहुमतात सभागृहात दाखल झाली. यामुळे भाजपचे पारडे जड समजले जात होते. आगोदर उपमहापौर कुलभूषण पाटील यांना महासभेच्या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार आहे का ? असा सवाल भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपस्थित केला. यामुळे सभागृहात चांगलाच गोधळ उडाला होता. तसेच नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आपल्या दालनात बोलवून सेटींग केल्याचा आरोप उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वर नगरसेवक सोनवणे यांनी केला. हा वाद तेवढ्यात न थांबता दलीतवस्ती निधी ची निविदा रद्द करण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानावर आक्षेप घेताना उपमहापौर व नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात थेट व्यासपीठावर धक्काबुकींचा धक्कादायक प्रकार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. सत्तेच्या जवळ असणाऱ्यांनी पातळी ओलांडली असल्याची प्रतिक्रिया देत जळगावकर नागरिक सोशल मीडियावर व्यक्त झालेले दिसून आले आहे.
हा वाद सावरण्यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले आहे. यामध्ये सविदा विषयावर भाजपच्या मागणी नुसार मतदान घेण्यात आले यामध्ये महापौरांनी दिलेल्या निर्णयानुसार संख्याबळ हे दोघांचे 26 असून समसमान आल्याचा निकाल जाहीर करण्यात आला. लगेच राष्ट्रगीताला सुरुवात करण्यात आली. यानंतर भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मतदान प्रक्रियेवर आक्षेप नोंदवित उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मतदानाच्या नावावावर खाडाखोड केली असल्याचा आरोप केला. व मतदान कायदेशीर जाहीर करण्याचे सांगितले मात्र मात्र नगर सचिव गोराने यांना धारेवर धरीत मतदान प्रक्रियेत घोळ झाला कसा असा जाब विचारला मात्र गोराने यांनी मी कोणताही घोळ अथवा चुकीचे काम केले नसल्याचा निर्वाळा दिला. बराच वेळ झालेंल्या वादा नंतर अखेर विषय आटोपता घेण्यात आला आहे. दरम्यान माझ्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आरोप फेटाळून लावले आहे.
अनेक प्रसार माध्यमावर वृत्ताचे थेट प्रक्षेपण सुरू असताना सभागृहात सुरू असलेल्या वादंगा वरून जळगावकरांची तळपायाची आग मस्तकात गेल्याचे पाहायला मिळाले आहे. शहरांतील सर्वच राजकारणी हे एकाच माळेचे मनी असल्याची प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर देण्यात आली आहे. शहरातील विकासकामांची मोठ्या प्रमाणात वाट लागली असताना मात्र मनपाच्या सभागृहात निविदेवरून झालेला गोधळ यामुळे मनपाची मान शरमेने झाली गेल्याची घटना घडली आहे. व्यवस्थापनावर अंकुश ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधीं थेट न्याय निर्वाळा न करता धक्काबुकींचा वर येतात तेवढेच नव्हे तर हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले आहे. यामुळे जळगावकरांच्या भवितव्याचे विकास मंदिर असणाऱ्या मनपाचे सभागृह मात्र कुस्ती मैदान झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
एकंदरीत मनपाच्या राजकीय वातावरणात संपूर्णतः अस्थिरता निर्माण झाली आहे. भाजपचे 27 नगरसेवक फुटून सेनेच्या गळाला लागल्याने भाजपमध्ये अस्थेर्य निर्माण झाले होते. मात्र एकूण 12 नगरसेवकांनी पुन्हा एकदा घरवापसी केल्याने भाजपचा बहुमताचा आकडा शाबूत राहिला मात्र महापौर, उपमहापौर हे भाजपमधून नसल्याने राजकीय कोंडी झाली आहे. बहुमत जरी भाजपकडे असले तरी देखील निर्णयाचे अधिकार हे प्रथम नागरिक असलेले महापौर यांच्याकडे असल्याने निर्णय अथवा ठराव करताना भाजपकडे बहुमत असताना संघर्ष करावा लागणार आहे. अस्थिरता निर्माण झालेले मनपाचे राजकारण सकारात्मक दृष्टीकोनातून विकासाचे वाट धरते की कोणत्या वळणावर जाते हे बघणे लक्षणीय असणार आहे.