जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असताना नुकतेच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेले पूर्वाश्रमीचे भाजपनेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भुसावळ मध्ये डी. एस ग्राउंड येथे भव्य राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे आयोजन केले असून यामध्ये हजारोच्या संख्येने मध्ये राष्ट्रवादी चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात असणार असणार आहे भाजपमधील झालेल्या छळा नंतर खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरत प्रवेश केला. त्या नंतर प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री व जळगाव जिल्ह्याचे संपर्क मंत्री असलेले अजित दादा पवार प्रथमच जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर असंख्य आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश सोहळा भुसावळ मध्ये माजी मंत्री खडसे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला आहे.
भाजपला जिल्ह्यात तगडे आव्हान उभे करणारे नेतृत्व खडसे यांच्या रुपात राष्ट्रवादीकडे दाखल झाले असताना त्यांना खडसे यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी मास्टर प्लॅन आपल्या चे बोलले जात आहे यासाठी खडसे यांनी भाजपमधील तसेच शिवसेनेमधील अनेक आजी-माजी नेत्यांचा पक्ष प्रवेश करून घेत आहे आगामी काळात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना राष्ट्रवादी तसेच खडसे समर्थकांनी निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला मानला जातो मात्र काही अंतर्गत मनभेदावरून त्यांना भाजप सोडावी लागली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला भुईसपाट करण्यासाठी चा प्रण खडसे यांनी आखाल्याचे बोलले जात आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा जळगाव जिल्ह्यात महत्वपूर्ण मानला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसे समर्थक हजारोच्या संख्येने राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थिती मध्ये दाखल होत आहे. उद्याचे खडसेंचे शक्ति प्रदर्शन व उपमुख्यमंत्री पवारांचा दौरा लक्षवेधी ठरणार आहे. याचे जिल्ह्यातील आगामी राजकारणात काय पडसाद उमटतात यावर पुढील समीकरणे अवलंबुन असणार आहे.