बोदवड राजमुद्रा वृत्तसेवा | नगरपंचायत निवडणूक 2021 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी महसुल कृषी मंत्री एकनाथ राव खडसे यांच्या हस्ते ग्रामदैवत रेणुका मातेला नारळ वाढवून करण्यात आला आहे. यावेळी शहरातील मुख्यबाजार पेठतून मतदारांना आवाहन करीत प्रचार रॅली काढण्यात आली होती.
राष्ट्रवादी च्या उमेदवारांना निवडणून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आवर्जून परिश्रम घ्यावे तसेच घराघरापर्यंत पोहोचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विकासाचे व्हिजन नागरिकांना समजावून सांगावे असे आवाहन यावेळी खडसे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे जोपर्यंत मतदारांपर्यंत उमेदवाराचे नाव जाणार नाही तोवर उमेदवाराचा मुख्यतः परिचय होणार नाही त्यामुळे बोदवड नगरपालिकेच्या निवडणुकीत सगळ्यांनी रात्रीचा दिवस करून उमेदवारांना विजयी करण्यात सहकार्य करावे असे खडसे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, एजाज मलिक, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष मजहर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व उमेदवार, पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.