जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महानगरपालिकेच्या काल दिनांक 15 डिसेंम्बर 2021 रोजी झालेल्या महासभेत भाजपा नगरसेवक व उपमहापौर यांनि एकमेकांवर तोडीपाणी , भ्रष्टाचार व राष्ट्रगीताचा अवमान केल्याचे आरोप केलेले आहेत . उपमहापौर यांना भाजप नगरसेवक व त्यांच्या समर्थकांकडुन धक्काबुक्की , मारहाण करत धमकावून दमदाटी करण्यात आली तसेच राष्ट्रगीत सुरू असतांना भाजप नगरसेवक उपमहापौर यांच्या दिशेने मंचावर धावत गेले असे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले व वृत्तवाहिन्यांनी याप्रकाराचे चित्रण प्रसारित केलेले आहे . हा सर्व प्रकार महापौर व आयुक्त तसेच लाईव्ह बघणाऱ्या समस्त नागरिकांनी बघितलेला आहे . महानगरपालिका सभागृहात नगरसेवक व मनपा कर्मचारी , अधिकारी यांच्या व्यतिरिक्त ईतरही काही लोक उपस्थित होते . या सर्व प्रकारामुळे जळगाव शहरवासीयांची मान शरमेने खाली झुकली असुन महानगरपालिकेची उरली सुरली पत देखील जनमानसात खालावलेली आहे .पवित्र महानगरपालिका सभागृहाची नाचक्की झाली असल्याचे निवेदन आज राष्ट्रवादी महानगरच्या वतीने देण्यात आले आहे.
तरी सभागृहात घडलेल्या या सर्व घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात येऊन राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्दल व तोडीपाणी , भ्रष्टाचार व बेकायदेशीर कृत्य ज्या नगरसेवकांनी त्यांच्या समर्थकांनी , नातेवाईकांनी केलेले असेल त्या सर्वांची पोलीस यंत्रणेमार्फत व लाचलुचपत प्रतिबंधक विभागमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी व या प्रकरणी दोशी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी . तसेच महानगरपालिकेच्या नगरसेवक नगरसेविका यांनी राष्ट्रगीताचा अवमान , भ्रष्टाचार ,तोडीपाणी केली असे चौकशीत निष्पन्न झाल्यास त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे . असे निवेदन जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक , आयुक्त व महापौर यांना देण्यात आले आहे . सदर निवेदनावर योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा महानगर तर्फे देण्यात आलेला आहे . निवेदन देतांना जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी , जिल्हा सरचिटणीस अशोक पाटिल , माजी नगरसेवक सुनील माळी , राजू मोरे , डॉ. रिजवान खाटीक , दिलीप माहेश्वरी , अमोल कोल्हे , सुशील शिंदे , राहुल टोके , नईम खाटिक , विशाल देशमुख , अनिल पवार , किरण राजपूत, सलीम ईनामदार , किरण चव्हाण आदि राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरचे उपस्थित होते .