जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा |जिल्हा सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत चोपडा येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शिबिराला जिल्ह्याचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, तालुक्यातील कर्तव्यदक्ष आमदार मा.लताताई सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, तहसीलदारा श्री वळवी साहेब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पाटील, जिल्हा सिकलसेल समन्वयक श्री. मनोज पाटील तालुक्यातील मा.नगराध्यक्ष तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सभापती व सदस्य, यांच्या प्रमुख उपस्थितीने तालुक्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी वर्ग यानी मार्गदर्शन शिबिराचा तसेच सर्वानी सिकलसेल चाचण्याचा लाभ यावेळी घेतला. सदरील भव्य कार्यक्रमाचे कौतुक जिल्ह्यातील सर्वच अधिकारी, मा पालकमंत्री, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी यानी केले.